Search This Blog

महाराष्ट्रातील कृषीसंबंधी प्रमुख योजना:
१)दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या विकासासाठी १९७४-७५ मध्ये महाराष्ट्र शासनाने अवर्षणग्रस्त    विभाग कार्यक्रम सुरु केला.
२)दारिद्र्यरेषेखाली अनुसूचित जाती ,जमाती व वेठ्बीगाराना विहिरी खोदुन व बांधून देण्यासाठी १९८८-८९ मध्ये केंद्र शासनाने जीवनधारा व जवाहर विहीर योजना सुरु केली.
३)शासनाने दुग्दविकासासाठी १९८४-८५ मध्ये गोकुलग्राम योजना सुरु केली 
४)१९७१ मध्ये भारतात दुध महापूर योजना सुरु झाली .१९८० मध्ये दुध महापूर योजना-भाग 
     २ सुरु झाली
५)danial benar यांच्या पुढाकाराने १९८२ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण व भेट योजना 
    सुरु करण्यात आली 
६)राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील एका गावचा कोरडवाहू शेतीतून आदर्श गाव म्हणून विकास 
   करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९८३-८४ मध्ये सुरु केलेली योजना म्हणजे कृषी 
   पंढरी योजना होय .नानासाहेब एंबडवार या योजनेचे मुख्य प्रवर्तक मानले जातात 
७)कृषी पंढरी योजनेचे जिल्हा पातळीवर नियोजन करण्यासाठी १९८३-८४ मध्ये 'इको युनिट 
    योजना ' सुरु करण्यात आली.
८)महाराष्ट्रात १९८३ मध्ये 'जलवापर प्रकल्प ' हि क्रांतिकारी योजना सुरु करण्यात आली.
Share on Google Plus

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.