Search This Blog

फक्त चार गुण मिळावा ,वन अधिकारी बना !


'महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षे'च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात खेळाडूंसाठीची कटऑफ इतकी घसरली आहे की अवघे चार गुण मिळालेले उमेदवारही मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरविण्यात आले आहेत.

या उलट खुल्या वर्गासाठीची कटऑफ तब्बल २९ गुणांची आहे. इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आदी इतर प्रवर्गासाठीची कटऑफही २९ किंवा त्याहून एक-दोन गुणांनी कमी आहे. पण, केवळ खेळाडूंसाठी राखीव असलेल्या पाच टक्के जागा भरण्याकरिता अवघे चार गुण मिळविणारा उमेदवारही या कोटय़ातून मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरला आहे. त्यामुळे, इतर प्रवर्गातील डाववल्या गेलेल्या उमेदवारांमध्ये मात्र कमालीची नाराजी आहे.

'महाराष्ट्र राज्य सेवा आयोगा'मार्फत (एमपीएससी) सहाय्यक वनसंरक्षक (गट अ) आणि वनक्षेत्रपाल (गट ब) या वन अधिकाऱ्यांच्या २८२ पदांकरिता २७ एप्रिलला पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. ९,३०० ते ३४,८०० अशी वेतनश्रेणी या पदांकरिता असणार आहे. दीड लाखांच्या आसपास उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ३,५०३ उमेदवार दुसऱ्या टप्प्याच्या मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत. उपलब्ध पदांच्या साधारणपणे ८ ते ९ टक्के उमेदवार मुख्य परीक्षेकरिता निवडले जातात. परंतु, यात खुल्या वर्गातून खेळाडूंकरिता राखीव असलेल्या पदांसाठीची गुणांची कटऑफ अवघे चार टक्के आहे. खेळाडूंच्या अनुसूचित जाती (४ गुण) आणि अनुसूचित जमातीसाठीची (८ गुण) कटऑफही अशीच घसरली आहे. पूर्व परीक्षेत कटऑफ किती खाली आणायची यावर काहीच मर्यादा नसल्याने त्याचा फायदा क्रीडा प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना होतो आहे. त्यामुळे, पूर्व परीक्षेतही मुख्य परीक्षेनुसार कटऑफ खाली आणण्यावर मर्यादा असावी, अशी मागणी उमेदवारांकडून होते आहे. मुख्य परीक्षेत कटऑफ जास्तीत जास्त २० टक्क्य़ांपर्यंत खाली आणता येते.
Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.