- जनगणना दर दहा वर्षांनी होते.
- पहिली जनगणना १८७२ ला लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली.
- १८८१ ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना पार पडली.
- १९५१ ला स्वतंत्र भारतात पहिली जनगणना पार पडली.
- १९५१ ला स्वतंत्र भारताचा पहिली जनगणना पार पडली.
- एकूणातील १५ वी जनगणना तर स्वातंत्र्यानंतरची ७ वी जनगणना.
- १९३१ ला जातीनिहाय जनगणना करण्यात आली. त्यानंतर २०११ ला जातीनिहाय जनगणना त्रिपूरा राज्यातील सखाला गावचे बदरुई देववर्मा यांच्या नोंदीने सुरुवात झाली.
- १९२१ हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते.
- भारताचे जनगणना आयुक्त सी चंद्रमोली (१८ वे)
- भारताचे पहिले जनगणना आयुक्त डब्ल्यु प्लॉडेन.
- भारताचे पहिली जनगणना इजिप्तमध्ये झाली.
- मृत्यूगणना करणारे पहिले राज्य – कर्नाटक.
- २०११ च्या जनगणनेची सुरुवात १ एप्रिल २०१० रोजी झाली.
- पहिली नोंदणी प्रतिभाताई पाटील यांची करण्यात आली.
- घोषवाक्य ‘आपली जनगणना आपले भविष्य ’
- शुभंकर – प्रगणक शिक्षिका
- जनगणना एकूण १८ भाषेत करण्यात आली.
- एकूण खर्च २२ कोटी
- जनगणना कायदा – १९४८
- जनगणना नियन – १९९०
- जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा १७.५%
- लोकसंख्येच्या बाबतीत चीन प्रथम क्रमांकावर तर भारत दुस-या क्रमांकावर
- ही जनगणना दोन टप्प्यात पार पडली.
- १) १ एप्रिल २०१० ते जुलै २०१० २) ९ फेब्रुवारी २०११ ते २८ फेब्रुवारी २०११
- हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू काश्मीर या हिमच्छादीत प्रदेशात ही जनगणना ११ सप्टेंबर २०१० ते ३० सप्टेंबर २०१० पहिला राऊंड तर दुसरा राऊंड १ ऑक्टोंबर २०१० ते ५ ऑक्टोंबर २०१० या काळात पार पडली.
- सन १९३१ पर्यंत जनगणना करण्यासाठी डे – फॅक्टो पध्दत वापरली जात होती.
- या पध्दतीनुसार पूर्व निर्धारीत तीन आठवड्याच्या काळात देशभर सर्वत्र प्रश्नावलीच्या साहाय्याने सर्वेक्षण केले जात होते व फेरतपासणी राऊंड घेऊन देशातील लोकसंख्या निश्चित केली जात होती. यामध्ये जन्म, मृत्यू, स्थलांतर, वय, लिंग, शिक्षण या बाबींचा विचार केला जात होता.
- सन १९३१ पासून सिंक्रोनाझड् डे – फॅक्टो पध्दतीचा अवलंब केला गेला.
- या पध्दतीनुसार एका विशिष्ट रात्री देशात सर्वत्र एकत्रितपणे सर्वेक्षण करुन माहिती गोळा केली जात होती. या पध्दतीनुसार एकाच वेळी खूप मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सन १९४१ मधील जनगणनेपासून विस्तारीत डे – फॅक्टो पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.
- विस्तारीत डे – फॅक्टो पध्द्त म्हणजे दोन टप्प्यात
- जनगणना यंत्रणा –भारतीय जनगणना विभागाचे कार्य मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते. तर याकरिता रजिस्ट्रार जनरल व जनगणना कमिशनरचे कर्यालय असून ते मिनिस्ट्री व होम अफेअर्सची संलग्न आहे. राज्यपातळीवर डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन, प्रमुख जनगणना अधिकारी, चार्ज ऑफीसर, जिल्हा अधिकारी, तहसिलदार, पर्यवेक्षक व सर्वेक्षक अशी साखळी असते. प्रत्यक्ष जनगणना करण्याचे काम सर्वेक्षक करीत असले तरी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शक करणे, प्रशिक्षण देणे, तंत्रिक मदत पुरविण्याचे कार्य वेगवेगळ्या स्तरावरून असते.
जनगणना
gk
,
janaganana
0 comments:
Post a Comment