Search This Blog

एम.पी.एस.सी. मधील संधी

दहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू या!
दहावी-बारावीच्या निकाल लागल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न भेडसावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. पण युवकांनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला सहज प्रशासनात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक, सातत्याने व आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे.

ध्येय ठरवा
जीवनात आपल्याला काय व्हायचे, हे ध्येय विद्याथ्र्यांनी ठेवले पाहिजे. त्यादृष्टीने जीवनक्रमाची आखणी केली पाहिजे. प्रत्येक मुलाला डॉक्टर, इंजिनीअर व्हावेसे वाटते. पण आपली आर्थिक, मानसिक व शैक्षणिक परिस्थिती कशी आहे त्याचाही विचार विद्याथ्र्यांनी या अभ्यासक्रमासाठी केला पाहिजे. केवळ इतर जातात किंवा या दोन व्यवसायाला क्रेझ आहे म्हणून वळू नये. म्हणून सर्वप्रथम ध्येयनिश्चिती करा. तुम्हाला ज्या क्षेत्रात ख-या अर्थाने आवड आहे, त्या क्षेत्राची निवड करा.

स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय
स्पर्धा परीक्षेचे ध्येय विद्याथ्र्यांनी ठरविले पाहिजे. या माध्यमातून एक रुपयाही खर्च न करता नोकरी मिळू शकते. युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन असे कितीतरी पर्याय आहेत. या परीक्षांचा अभ्यास पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षापासून केला तर तो विद्यार्थी परीक्षेनंतर एकाच वर्षात नोकरी मिळवू शकतो. पण त्यासाठी जिद्द, सातत्य, नियोजन आणि अचूक प्रयत्नाची गरज आहे.

आपले व्यक्तिमत्त्व घडवा
नोकरीसाठी मुलाखत ही बाब आवश्यक झाली आहे. त्यासाठी विद्याथ्र्यांनी सर्वप्रथम आपले व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे. तो तत्पर, तेजस्वी व तपस्वी असला पाहिजे. अभ्यासात प्रगती केलीच पाहिजे. पण त्याचबरोबर भाषण, वादविवाद, गटचर्चा, क्रीडा, गायन, बुद्धिमत्ता चाचणी, मुलाखत तंत्र या माध्यमातून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्याचा प्रयत्न विद्याथ्र्यांनी केला पाहिजे.

रोज 30 प्रश्न सोडवा
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात व इतरत्र जाणा-या विद्याथ्र्यांनी रोज 30 प्रश्न सोडविण्याचा सराव केला पाहिजे. रोजचे 30 तर महिन्याचे 900. एका वर्षात 10800 प्रश्न तर आणि तीन वर्षात 32400 प्रश्न सोडविले जातील. एमपीएससीला प्रश्न येतात 200 आणि युपीएससीला येतात 400 तीन वर्षे या प्रश्नांची तयारी करीत असलेला विद्यार्थी कोणतीही स्पर्धा परीक्षा सहज पास होतो. फक्त सातत्याने सराव करणे गरजेचे आहे.

शासकीय संस्था
महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारली असून प्रशिक्षण, निवास, भोजन आणि विद्यावेतनाची सोय करून दिली आहे. मुंबईला एसआयएसी, पुण्याला यशदा, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथे एसआयएसीच्या शाखा कार्यरत आहेत. प्रत्येक बॅचमध्ये 100 विद्याथ्र्यांना प्रवेश दिला जातो. येथे विद्यावेतन मिळते. शिवाय प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्रे आहेतच.

विद्यार्थिनींनो अधिकारी व्हा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींसाठी 33 टक्के आरक्षण आहे. त्यांना पूर्व परीक्षेमध्ये मुलांपेक्ष्ज्ञा 5 गुण कमी मिळाले तरी उत्तीर्ण घोषित कण्यात येते. खरं तर विद्यार्थिनींसाठी ही सुवर्णसंधी आहे. प्रशासनात आज महिलांची गरज आहे. एका सर्वेक्षणानुसार फक्त 1.51 टक्के महिला प्रशासनात आहेत. प्रशासनातील अधिका-यांच्या जागा महिलांची वाट पाहात आहेत. म्हणून मुलींनी प्रशासकीय सेवेकडे वळणे गरजेचे आहे.

मागासवर्गीय विद्यार्थी
प्रशासनात मागासवर्गीय विद्याथ्र्यांसाठी आरक्षण आहे. शिवाय त्यांना प्रशासनात जाण्यासाठी शासनाने विविध खात्यामार्फत प्रशिक्षणाची व विद्यावेतनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी युवक व युवतींसाठी आदिवासी विभागाने विविध योजनांची व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा घेऊन युवकांनी प्रशासनात गेले पाहिजे.

प्रशासन म्हणजे देशसेवा
केंद्र शासनात किंवा महाराष्ट्र शासनात तुम्हाला रोजगार मिळाला, तर त्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे करता येतात. शासकीय योजना तळागळातील लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचता येते. शिवाय या नोकरीमध्ये स्थैर्य असते. फार तर बदली होईल, पण ताबडतोब काढून टाकल्या जात नाही. आपण स्वेच्छेने, आनंदाने आणि समाधानाने शासनात काम केले तर विविध पुरस्कार घेऊन तुमचा गौरव करण्यात येतो.

दहावीनंतर एमपीएससी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दहावीनंतर देता येते, हे अनेकांना माहिती नाही. लिपीक व टंकलेखक या परीक्षा आहेत. ज्यांची परिस्थिती पुढे शिकण्याची नाही अशा विद्याथ्र्यंनी एमपीएससीची परीक्षा दिली पाहिजे. ही परीक्षा वैकल्पिक प्रश्नांची असते. दहावी स्तरावरचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. या परीक्षेला मुलाखत नसते. लेखी परीक्षेचया आधारावरच उमेदवाराची निवड केली जाते.

परीक्षा फॉर्म
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अर्ज व माहितीपुस्तिका जिल्ह्याच्या प्रधान डाकघरात उपलब्ध आहे. युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएसची परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते. या परीक्षेची जाहिरात रोजगार समाचार या नियतकालिकात प्रसिद्ध होते. अर्जाची किंमत 20 रुपये व परीक्षा फी फक्त 50 रुपये आहे. भारतीय प्रत्यक जिल्ह्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये या परीक्षेचा अर्ज मिळतो. शिवाय ऑनलाईन फॉर्मदेखील भरता येतो.

Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.