Search This Blog

Current affairs May 2015 (MPSC)

23. May
1.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रपती भवन आणि त्याच्याशी संलग्न परिसरामध्ये 30 वाय्-फाय् ॲक्सेस पॉईंट्ससह 24 हॉट स्पॉटचे उद्‌घाटन केले. यामुळे हा परिसर 100 टक्के वाय्-फाय् युक्त झाला आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत 89व्या स्थानावर आहे. सिंगापूर, फिनलंड, स्वीडनसारखे देश यात आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. देशभरात इंटरनेट आणि आय.सी.टी-संलग्न सेवांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले. देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी वाय्-फाय् सुविधा सुरु करता येईल, असे ते म्हणाले. सरकारची धोरणे आणि योजना देशातील विविध भागांत पोहोचत नाहीत. नेटवर्कमुळे हे शक्य होईल आणि भारताचे डिजिटल भारत असे रुपांतर होईल, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
2.केंद्रीय ऊर्जा, कोळसा आणि नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल वॉशिंग्टन येथे अमेरिका-भारत व्यापार गुंतवणूक गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी त्यांनी अमेरिकी प्रशासनाच्या महत्वपूर्ण सदस्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी, व्यापाराच्या चांगल्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक समावेशकतेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
3.प्रयोगांच्या माध्यमातून सत्याचा शोध घेण्यासाठी तसेच उद्योग आणि कृषी क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक – आर्थिक विकास साध्य करण्यासाठी विज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर आवश्यक आहे, असे मत उपराष्ट्रपती एम्. हमिद अन्सारी यांनी व्यक्त केले आहे. बंगळुरु येथे 15व्या अखिल भारतीय पिपल्स सायन्स काँग्रेसचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमच्या काळी शास्त्रीय युक्तिवाद बिंबवणे आणि शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे हे आधुनिकते इतके वास्तविक होते असे ते म्हणाले.
21. May
1.20 मे 1965 या दिवशी एव्हरेस्ट वर प्रथमच यशस्वी चढाई करणाऱ्या भारतीय पथकातील सदस्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, व त्यांची प्रशंसा केली. त्यावेळी त्या मोहिमेत सहभागी झालेले परंतु आता त्यात नसलेल्या सदस्यांचे कुटुंबियही यावेळी उपस्थित होते. त्यांचीही मोदीनी आस्थापूर्वक चौकशी केली. या ऐतिहासिक यशबद्दल पंतप्रधानांनी या सदस्यांचे अभिनंदन करत 50 वर्षांपर्वीच्य या मोहिमेमुळे प्रेरित झालेल्या कोट्यावधी भारतीयांपैकी आपण एक होतो, अशी आठवण मोदी यांनी यावेळी सांगितली. “द ग्रेट हिमालया क्लाईंब” या पुस्तकाचे प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
2.केंद्रीय अर्थसंकल्प 2015 मधे सेवाकर 12 टक्क्यावरुन 14 टक्के असा वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्याच्या अमलबजावणीची तारीख नंतर अधिसूचित करण्यात येणार होती. आता वित्त विधेयक 2015चे कायद्यात रुपांतर मंजूर झाल्यामुळे केंद्र सरकारने प्रस्तावित वाढीव दर 1 जून 2015 पासून लागू होईल असे अधिसूचित केले आहे. सेवाकरासोबत शिक्षण उपकर (एज्यूकेशन सेस) तसेच माध्यमिक (सेकंडरी) आणि उच्च (हायर) शिक्षण उपकर वसूलीची तरतूद 1 जून 2015 पासून थांबविण्यात येईल. कारण आता त्यांचा समावेश 14 टक्के दराच्या सेवा करात करण्यात आला आहे. काही इतर बदल सुद्धा 1 जून 2015 पासून लागू होणार असल्याचे अधिसूचित करण्यात आलेले आहे. मात्र स्वच्छ भारत उपकर हा सर्व किंवा कोणत्याही करपात्र सेवांवर कोणत्या तारखेपासून लावण्यात येईल ते नंतर अधिसूचित केले जाईल.
3.मायक्रोनेशियाच्या संघ राज्याचे आठवे अध्यक्ष म्हणून महामहिम पिटर एम ख्रिस्तीयन यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पुढील संदेश पाठविला आहे. “भारत सरकार व भारतीय जनता तसेच मी व्यक्तीश: आपल्या निवडीबद्दल अभिनंदन करतो. आपल्या दोन्ही देशात दृढ व मैत्रीपूर्ण संबंधांची परंपरा आहे. आपणा दोघांना भेडसावणाऱ्‍या समान आव्हानांचा आपण एकत्रितपणे मुकाबला करु व या जागतिक बदलांच्या युगातील संधींचा लाभ घेऊ.” “आपले सौख्य व आरोग्य यासाठी तसेच फेडरल स्टेट ऑफ मायक्रोनेशियाच्या स्नेहशील जनतेच्या प्रगती व भरभराटीसाठी मी शुभेच्छा देतो”, असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
20. May
1.देशातील विविध पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे संयुक्त पदवीधर स्तर (टियर – 1) परिक्षा 2015, दि. 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2015 दरम्यान घेण्यात येईल. यासाठी अर्ज मागविणारी जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि.2-8 मे 2015 या अंकांत प्रसिद्ध झाली आहे. तसेच ती http://sss.nic.in आणि http://sscwr.net या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठांचे पदवीधर या परिक्षेस बसू शकतात. परिक्षेचे शूल्क रु.100/- आहे. भाग 1 च्या अर्ज नोंदणीची शेवटची तारीख 28 मे 2015 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत व भाग -2 ची नोदणी 1 जून 2015 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे.
2.जिनिव्हा येथे आज 68व्या जागतिक आरोग्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तटस्थ (नॉन अलाईन्ड मुव्हमेंट) राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्राी आणि या सभेचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी संबोधित केले.
3.भारतीय हवाई दलाचे “एस यू – 30 एम के आय” हे लढाऊ विमान आज नेहेमीचा सराव करतांना आसाममधील तेजपूर पासून 36 कि.मी. अंतरावर कोसळले. तेजपूर हवाई तळावरुन मंगळवारी दुपारी 12.17 वाजता या विमानाने झेप घेतली. पण 12.30 वाजता ते कोसळले. दोन्ही वैमानिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे.
4.मूळ भारतीय वंशाचे असलेले अमेरिकेच्या लुसियाना प्रांताचे राज्यपाल बॉबी जिंदाल हे सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी ही शक्‍यता आजमविण्यासाठी चाचपणी समितीची स्थापना केली आहे. 2016 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्याची त्यांची इच्छा आहे. जिंदाल यांनी उमेदवारी जाहीर केली नसली तरी तसे केल्यास ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पहिले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक ठरतील. मात्र, यासाठी त्यांना पक्षामध्येच जोरदार स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. चाचपणी समितीची स्थापना करणे हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याच्यादृष्टीने उचललेले पहिले पाऊल समजण्यात येते. अर्थात, लुसियानाच्या विधिमंडळाची जूनमध्ये मुदत संपल्यानंतरच याबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचे जिंदाल यांनी स्पष्ट केले आहे. जिंदाल यांनी आपल्या संकेतस्थळावर नागरिकांना आवाहन केले आहे. सध्याच्या पिढीपेक्षा पुढील पिढीला कमी हक्क मिळू नयेत, यासाठी आपण लढले पाहिजे. तुम्ही माझ्याबरोबर आहात का?, असे या संकेतस्थळावर म्हटले आहे. अमेरिकेच्या नागरिकांना वेगळ्या दिशेने जाणे पसंत असते, या कल्पनेच्या आधारावरच आपण उमेदवारी जाहीर करण्याचा विचार करू, असेही जिंदाल यांनी म्हटले आहे. जिंदाल यांनी विविध क्षेत्रांसाठी असलेल्या आपल्या योजना इतर रिपब्लिकन नेत्यांपेक्षा वेगळ्या असल्याचे नागरिकांवर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे.
18. May
1.कॉर्पोरेशन बॅंकेने महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सर्वात जुन्या ‘रूपी बॅंके‘चे अधिग्रहण करण्याची योजना सध्या नसल्याचे सांगितले आहे. ‘‘सध्या रूपी बॅंक घेण्याचा आमचा कोणताही प्रस्ताव नाही‘‘ असे कॉर्पोरेशन बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-यांने सांगितले. ‘रूपी बॅंक‘ महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सर्वात जुनी सहकारी बँक आहे. बॅंकेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर 36 शाखा असून सध्या बँकेला 652 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या दोन वर्षांपासून त्यावर प्रशासक नेमलेला आहे. पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक देखील ‘रूपी बॅंके‘चे अधिग्रहण करण्याच्या शर्यतीत होते. परंतु त्यांनी त्यातून माघार घेतली आहे. कॉर्पोरेशन बॅंकेच्या या निर्णयामुळे आता ‘रूपी बॅंके‘चे 6.30 लाख ठेवीदार प्रभावित होणार आहेत.
2.एचडीएफसी बँकेने त्यांच्यातर्फे पुरवण्यात येणार्‍या सेवांवरील शुल्कात वाढ केली आहे. विविध सेवा उत्पादनांवर 43% ते 50% सेवा शुल्क वाढ करण्यात आली आहे. यामध्ये डेबिट कार्ड आणि तात्काळ पेमेंट सेवा (आयएमपीएस) यांसारख्या सेवांचा समावेश आहे. सद्यस्थितीत दहा हजार रुपयांच्या तात्काळ पेमेंट सेवेवर (आयएमपीएस) 3.5 रुपये (कर वगळून) शुल्क आकारते. तथापि, आता दहा हजार रुपयांच्या तात्काळ पेमेंट सेवेवर सुधारित शुल्क रु. 5 रुपये आकारण्यात येणार आहे. ही नवीन दर वाढ 15 मे 2015 पासून लागू करण्यात येणार आहे. एचडीएफसी बँकेने संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.
3.केंद्राच्या नीती आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असून, प्रत्येक सरकारी विभागाला आता कॉर्पोरेट प्रणालीप्रमाणे काम करावे लागणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांच्या समन्वयाने हे दल काम करणार आहे. विविध विभागाचा कामाचा आढावा घेणारी पुस्तिका कृती दलातर्फे तयार करण्यात येणार आहे. ही पुस्तिका केंद्र सरकारसोबतच विविध दूतावासांनाही पाठविण्याचा सरकारचा मानस आहे. गेल्या फेब्रुवारीत नवी दिल्लीत नीती आयोगाच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या विविध विभागात विशेष कृती दल स्थापन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने कृषी, जलसंधारण, जलसंपदा, सामाजिक न्याय, ग्रामविकास, आदिवासी विकास, नगरविकास आदी विभागांचा “मेकओव्हर‘ करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र पाठविले आहे. क्षत्रिय यांनी देखील सर्व विभागांच्या सचिव आणि मुख्य सचिवांना विभागांसाठी समाजातील तज्ज्ञ आणि अधिकारी यांचा विशेष कृती दल स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी प्रत्येक विभागांनी दर महिन्याला प्रगतीचा लेखाजोखा प्रसिद्धीसाठी जनसंपर्क विभागाकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे.
15. May
1.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि फिल्म प्रभाग निर्मित 16 नवीन कल्पक माहितीपट व निमेशन चित्रपट 16 व 17 मे 2015 रोजी मुंबईमध्ये फिल्म डिव्हिजनच्या पूर्नध्वनिमुद्रित थिएटरमध्ये दाखविण्यात येणार आहेत. फिल्म्स डिव्हिजनने मागील दोन वर्षात निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव म्हणजे “उत्सव” पारदर्शक व परिणामकारक प्रक्रियेमुळे मागील काही वर्षात फिल्म डिव्हिजनने काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे. हा आनंदोत्सव सकाळी 11 वाजता सुरु होऊन रात्री पावणे दहा पर्यंत सुरु राहिल. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर या महोत्सवात सर्वांना प्रवेश दिला जाईल.
2.विभिन्न राज्यांकडून चालू खरीप हंगामातील पिक पेरणी संदर्भातील प्राप्त प्राथमिक अहवालानुसार तांदूळ पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. वर्ष 2014-15 च्या 1.50 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत वर्ष 2015-16 मध्ये 1.80 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची पेरणी झाली आहे.
3.सर्वप्रथम माझ्या अनन्यसाधारण स्वागत व आदरातिथ्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष शी, पंतप्रधान ली आणि चीनच्या जनतेचे आभार मानतो. शियानमधील माझ्या विशेष स्वागतासाठी आणि शहराचा अतुलनीय सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष शी यांचा ऋणी आहे. ही जागतिक धरोहर आहे. शियान हे आपल्या प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक जोडणीचे देखील प्रतिक आहे. भिक्षू शुआन झँग यांच्यामुळे शियानसोबत माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांनी 1400 वर्षांपूर्वी माझ्या गावाला भेट दिली होती. माझ्या सरकारच्या पहिल्या वर्षात चीनचा दौरा करताना मला आनंद होत आहे. ही आपली सर्वात महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागिदारी आहे. कारण तर उघडच आहे. भारत व चीन यांचा पुनर्विकास आणि त्यांच्या संबंधांचा दोन्ही देशांवर सखोल प्रभाव आहे. मागील दशकात आपले संबंध गुंतागुंतीचे झाले होते. परंतु, जगासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी आणि हे आपले परस्पर संबंध दृढ करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्यावर आहे. दोन मोठया आशियाई देशांमध्ये नवीन दिशा दिग्दर्शन करण्यासाठी आपण वचनबध्द आहोत. मला आशा आहे की राष्ट्राध्यक्ष शी आणि पंतप्रधान ली यांच्या सोबतची माझी चर्चा आपले संबंध त्या दिशेने नेण्यासाठी पाठिंबा देईल. आमचा संवाद हा मनमोकळा, विधायक आणि मैत्रीपूर्ण झाला. आम्ही सर्व मुद्दयांवर चर्चा केली. यामध्ये आपल्या संबंधांच्या निर्विघ्न विकासामध्ये अडथळा आणणाऱ्या मुद्दयांचा देखील समावेश होता. दोन मोठया आशियाई देशांमध्ये नवीन दिशा स्थापन करण्यासाठी आपण वचनबध्द आहोत. मी काही मुद्दयांवर चीनला त्यांचा दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्यावर जोर दिला जे आपल्या संबंधांचा संपूर्ण लाभ घेण्यापासून आपलयाला अडवत आहेत. मी सूचित केले की चीनला आपल्या संबंधांच्या धोरणात्मक व दिर्घकालीन दृष्टीकोनावर लक्ष दिले पाहिजे. या संदर्भात मला चीनची भूमिका सकारात्मक वाटली. सीमा प्रश्नावर आम्ही निष्पक्ष, तर्कसंगत आणि द्विपक्षीय स्विकार्य समाधान शोधण्यावर सहमत झालो आहोत. आम्ही दोघांनी सीमा क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या वचनबध्दतेवर पुन्हा जोर दिला. त्यांनी या मुद्दयावर आमच्या चिंतेवर संवेदनशीलता दाखवली. तसेच विश्वास पूर्नप्रस्तापित करण्याच्या उपाययोजनांना गती देण्याची सहमती दर्शवली. मी या संदर्भात वास्तविक नियंत्रण रेषा स्पष्ट करण्याच्या महत्त्वावर देखील जोर दिला. मी वीजा योजना आणि सीमेपार नदयांसंदर्भातल्या मुद्दयांच्या ठोस प्रगतीवर जोर दिला. मी आपल्या काही क्षेत्रीय चिंतांबाबत देखील चर्चा केली. आम्ही सहमत झालो की, जर आम्ही पुढे मार्गक्रमण केले तर, आम्ही एकमेकांचे हित, द्विपक्षीय विश्वास मजबूत करणे, परिपक्वतेसह आपापसातले मतभेद दूर करणे तसेच प्रलंबित मुद्दयांवर समाधान शोधण्यासाठी संवेदनशील झालो पाहिजे. आपल्या क्षेत्रात धोरणात्मक संवाद व समन्वय वाढविण्याचा आमचा निर्णय विशेषत: महत्त्वपूर्ण आहे. द्विपक्षीय सहकार्य आमच्या संवादाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आम्ही आमच्या आर्थिक संबंधांसाठी उच्च स्तरीय महत्त्वाकांक्षेचे लक्ष्य ठेवले आहे. आम्ही आमच्या अनेक द्विपक्षीय संधी आणि शहरीकरणासारख्या आव्हानांवर देखील विचार विनिमय केले. गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या शिखर संमेलनाच्या वचबबध्दतेच्या प्रगतीवर आम्ही खुश आहोत. यामध्ये रेल्वेमधील सहकार्याचा समावेश आहे जिथे आम्ही विशेष प्रकल्प तसेच गुजरात व महाराष्ट्रामध्ये चीनचे दोन औद्योगिक पार्क स्थापन करण्याची निवड केली आहे. मला आनंद आहे की दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री माझ्या सोबत आहे. आमच्या मेक इन इंडिया अभियान व पायाभूत क्षेत्रामध्ये चीनची भागिदारी वाढविण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. काल शांघाई इथे खाजगी क्षेत्रातल्या वीसहून अधिक करारांवर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्राध्यक्ष शी आणि प्रधानमंत्री ली यांनी मी उपस्थित केलेल्या सर्व चिंतावर लक्ष दिले. दोन्ही देशांमधील जनतेमधील संपर्क वाढविण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. भारत आणि चीनमधील लोक एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखत नाहीत तसेच त्यांना एकमेकांबद्दल खूप कमी माहिती आहे. भारताने पहिल्यांदा एखाद्या देशासोबत राज्य व प्रांतीय नेत्यांचे व्यासपीठ सुरु केले आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान पर्यटनाचा विकास होईल. आम्ही शांघाईमध्ये गांधीवादी व भारतीय अध्ययन केंद्र कुनमिंगमध्ये योग महाविद्यालय व द्विपक्षीय विचार मंच स्थापन करणार आहोत. कैलाश मानसरोवर यात्रेसाठी भारतीय तीर्थ यात्रेकरुंचा नाथु ला मार्ग जूनमध्ये सुरु होईल. यासाठी मी चीनचा आभारी आहे. चेंगदू व चेन्नई येथे वाणिजय दूतावास स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे द्विपक्षीय सहकार्य व संबंधांसाठी दोन्ही देशांच्या वचनबध्दतेचा विकास आहे. या सर्व उपाय योजनांमुळे आपले संबंध अधिक व्यापक व लोक-केंद्रीत बनण्यास मदत होईल. अंतत:, आमचे वैश्विक व क्षेत्रीय हित सामाईक आहे. उदाहरणार्थ, हवामान बदलावर आंतरराष्ट्रीय चर्चेचे परिणामांमध्ये आमचे एकत्रित हित आहे. आम्ही दोघे क्षेत्रीय सहकार्य मजबूत करण्याचे प्रयत्न करत आहोत. दहशतवादाचे संकंट दोघांवर आहे. पश्चिम आशियामधील अस्थिरता आम्हा दोघांसाठी चिंतेचा विषय आहे. अफगाणिस्थानामधील शांती व प्रगतीचा आम्हा दोघांना फायदा होईल. मला विश्वास आहे की आमची आंतरराष्ट्रीय भागिदारी अधिक दृढ होईल. आज, आम्ही 20 हून अधिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्‍या. ज्यामध्ये सहकार्याचे विविध क्षेत्र समाविष्ट आहे. यामुळे आमच्या संबंधांची प्रगल्भता आणि परिपक्वता तसेच आमच्या संबंधांच्या सकारात्मकतेची दिशा लक्षात येते. हा दौरा खूपच सार्थक आणि सकारात्मक दिशा लक्षात येते. मला राष्ट्राध्यक्ष शी आणि प्रधानमंत्री ली च्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या संबंधांच्या विजनला साकार करण्यासाठी शिखर संमेलन होण्याचा राष्ट्राध्यक्ष शी यांचया प्रस्तावाचे मी स्वागत करतो. मी पंतप्रधान शी यांना भारत दौऱ्याचे आमंत्रणही दिले आहे.
14. May
1.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या राष्ट्रपती भवनात, वर्ष 2011-12 व वर्ष 2012-13 यावर्षासाठीचे शास्त्रीय तामिळ राष्ट्रपती पुरस्कार वितरीत करणार आहेत. शास्त्रीय तामिळ भाषा व साहित्यात भरीव योगदान दिलेल्या विद्वानांचा सन्मान करण्यासाठी शास्त्रीय तामिळ राष्ट्रपती पुरस्कारांची स्थापना करण्यात आली.
2.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक २०१२ मध्ये सुधारणा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक २०१२ तील सुधारणांमुळे बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा विधेयक १९८६ च्या कायद्यात बरेच बदल होतील. १. सर्व प्रकारच्या श्रमांमध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींना कामावर ठेवण्यास प्रतिबंध असेल. हे वय मुक्त व अनिवार्य शिक्षण कायदा, २००९ शी जोडण्यात आले आहे. परंतु यास एक अपवाद आहे: अ. जर मुल कुटुंबात किंवा कौटुंबिक व्यवसायात काम करत असेल व जे काम करण्यात कोणताही धोका नाही; तसेच शाळेव्यतिरिक्त वेळात व सुट्ट्यांमध्ये काम करत असेल. ब. जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका यांसारख्या मनोरंजन क्षेत्रात किंवा सर्कस सोडून इतर क्रीडा क्षेत्रात मुल काम करत असेल (यामध्ये देखील अटी व सुरक्षा नियम समाविष्ट आहेत) तर अशा कामांमुळे मुलांचे शालेय शिक्षण प्रभावित होऊ नये. मंत्रिमंडळाने १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी प्रस्तावास मान्यता दिली आहे. अर्थात हे पाऊल उचलताना देशातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. देशात मोठ्या प्रमाणावर कुटुंबांमध्ये मुले शेती कामात अथवा कारागिरीत आपल्या आई-वडिलांना मदत करतात. हे करत असताना ते कामात पारंगत होत जातात. त्यामुळे मुलांचे शिक्षण व देशाची सामाजिक-आर्थिक परिस्थिती यांमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. याच कारणाने मंत्रिमंडळाने बालकामगार विधेयकात सुधारणा करण्यास मान्यता देताना कुटुंबास हातभार लावण्याचीही परवानगी दिली आहे. परंतु हे कौटुंबिक व्यवसाय धोकादायक असू नयेत. मुले ही कामे शाळेतून परत आल्यानंतर व सुट्ट्यांमध्ये करू शकतात. मुले जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका यांसारख्या मनोरंजन कार्यक्रमात किंवा सर्कस सोडून कोणत्याही खेळत काम करू शकतात. अर्थात यामध्येही काही अटी व सुरक्षेचे मुद्दे समाविष्ट होऊ शकतात. ही कामे मुलांचे शालेय शिक्षण प्रभावित करणारी नसावीत. २. बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) कायद्या अंतर्गत कुमारवयीन (१४ ते १८ वर्ष वय) मुलामुलींच्या कामाची नवी व्याख्या ठरवण्यात आली आहे. यामध्ये धोकादायक कामांमधील मुलांचा सहभाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. ३. कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी नव्या सुधारणांमध्ये असे काम करून घेणाऱ्यांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव आहे. अ. पहिल्यांदा कायद्याचे उल्लंघन सरून अपराध केल्यास कमीतकमी सहा महिन्याची कैद होईल. हा कालावधी २ वर्षांपर्यंत वाढू शकतो. दंडाची रक्कम २० हजार ते ५० हजार आहे. याशिवाय दंड व कैद एकत्र होऊ शकते. यापूर्वी कैदेच कालावधी ३ महिने व दंड १० हजार ते २० हजार होता. ब. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास किमान एक वर्षांची तर कमाल तीन वर्षांची कैद होऊ शकते. यापूर्वी हा कालावधी ६ महिने ते २ वर्ष इतका होता. ४. कायद्याचे उल्लंघन करून लहान मुले किंवा किशोरवयीन यांना कामावर ठेवणे, हा दखलपात्र गुन्हा बनविण्यात आला आहे. ५. आई-वडील/पालक यांसाठी शिक्षा: या कायद्यामध्ये आई-वडिलांसाठी देखील हीच शिक्षा आहे. मात्र आई-वडील/पालक यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पहिल्यांदा हा अपराध केल्यास कोणतीही शिक्षा होणार नाही. दुसऱ्यांदा व त्यानंतर अपराध केल्यास १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. ६. एक किंवा अधिक जिल्ह्यात बाल व किशोर श्रम पुनर्वसन निधी उभारला जाईल. या निधीतून श्रमातून मुक्त केलेल्या मुलांचे पुनर्वसन होईल. अशा पदधतीने पुनर्वसन कार्यक्रम घेण्यासाठी या कायद्यातच निधीची तरतूद करण्यात आली आहे.
3.केंद्रीय मंत्रिमंडळाने आज नमामी गंगे कार्यक्रमाला मान्यता दिली. व्यापक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या गंगा स्वच्छता व सुरक्षा कार्यक्रमाला यामुळे एकात्मिक स्वरुप प्राप्त होईल. अर्थसंकल्पात आगामी पाच वर्षांसाठी या कार्यक्रमाकरिता 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला गती प्राप्त करून देण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत येणाऱ्या विविध कार्य व प्रकल्पांसाठी केंद्र सरकार 100 टक्के निधी देणार आहे.
4.महामार्ग क्षेत्राला अधिक गती प्राप्त करून देण्यासाठी तसेच यात खाजगी क्षेत्राची भागीदारी पुन्हा मजबूत करण्याच्या उद्देशाने आर्थिक व्यवहारांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आज दोन मुख्य धोरणात्मक उपक्रमांना आज मान्यता दिली. सरकारचा हा निर्णय 2009 च्या पूर्वीच्या आणि नंतरच्या स्वाक्षऱ्या केलेल्या कंत्राटांना समान लागू होईल. वर्ष 2009 च्या पूर्वी निर्माण, क्रियान्वयन व हस्तांतरणाच्या 80 प्रकल्पांचे कंत्राट देण्यात आले आहे. यांचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पामध्ये अंदाजे चार हजार कोटी रुपये अडकले आहेत.

13. May
1.देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल उत्तर कोरियाने आपल्या लष्करप्रमुखाला आज (बुधवार) गोळ्या घालून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. सोलच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवा विभागाने संसद सदस्यांना ही माहिती दिली. वडिलांचे २०११ मध्ये निधन झाल्यानंतर किम जोन उन यांनी उत्तर कोरियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भ्रष्ट उच्चस्तरीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मालिकाच त्यांनी सुरू केली. त्यात लष्करप्रमुखांवरील या कारवाईची भर पडली असून, जगभरात याची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेशी वैमनस्य असलेल्या उत्तर कोरियाला अनेक पाश्चात्य देशांनी एकाकी पाडले आहे. उत्तर कोरियाचे लष्करप्रमुख ह्योन याँग चोल यांना येथील विमानांवर हल्ले करणाऱ्या बंदुकधारी पथकाकडून शेकडो लोकांच्या उपस्थितीत गोळ्या घालण्यात आल्या. आपल्या सत्तेला आव्हान दिल्याबद्दल शिक्षा म्हणून कोरियन अध्यक्ष किम यांनी या वर्षात आतापर्यंत १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर संस्थेने मागील महिन्यात जाहीर केले होते. लष्करप्रमुख चोल यांनी एप्रिलमध्ये मॉस्को येथील एका सुरक्षा परिषदेत उत्तर कोरियाचे प्रतिनिधित्व करून येथे भाषणही केले होते. त्यांनी एका लष्करी कार्यक्रमात डुलक्या घेऊन अध्यक्ष किम यांचा अनादर केला होता, असे सांगण्यात आले.
2.देशातील लसीकरणाचे प्रमाण चिंता करायला लावणारे आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण 58 टक्के असून, शहरी भागात 67 टक्के असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने आज दिले. लस उपलब्ध नसणे आणि लसीकरणाबाबत पालकांमध्ये असलेली उदासीनता या कारणांमुळे लसीकरणाचे प्रमाण वाढत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. नड्डा म्हणाले, “”ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण सध्या 58.5 टक्के एवढे चिंताजनक आहे. तर शहरी भागात हेच प्रमाण 67.4 टक्के आहे.‘‘ हे प्रमाण कमी असण्यामागे अनेक कारणे असली, तरी लसीकरणाच्या फायद्याबाबत पालकांमध्ये असलेली उदासीनता हे सर्वांत मोठे कारण आहे. लसीकरणाचे दुष्परिणाम आणि लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसणे आदींमुळेही लसीकरणाचे प्रमाण वाढताना दिसते नाही, असे नड्डा यांनी या वेळी सांगितले. तसेच नव्या लसीची निर्मिती करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून सरकारतर्फे निधी देण्यात आला नसल्याचेही नड्डा यांनी मान्य केले. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे नड्डा यांनी सांगितले. लसीकरणासाठी राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी पुरविण्यात येत असून, कमी लसीकरण असलेल्या भागांमध्ये वेळोवेळी लसीकरण सप्ताहांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहितीही नड्डा यांनी या वेळी दिली. सरकारने “मिशन इंद्रधनुष्य‘ सुरू केले असून, त्याद्वारे देशातील 201 जिल्ह्यांवर विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. कमी लसीकरण असलेल्या किंवा लसीकरण करण्यात न आलेल्या भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. देशात पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 1995-96 ते जानेवारी 2015 पर्यंत 1261.01 कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
12. May
1.शतकानुशतके भारतीय संस्कृती, कला, संगीत आणि चित्रपटांवर रशियातील नागरिकांनी नेहमीच भरभरुन प्रेम केले आहे, तसेच भारतीय नागरिकांचे देखील रशियन साहित्य आणि परंपरेवर अमाप स्नेह आहे असे उद्‌गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. रशियामध्ये मॉस्को येथे रविवारी “नमस्ते रशिया” या भारतीय संस्कृती महोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. रशियाच्या संस्कृती मंत्रालयाच्या पाठिंब्याने “नमस्ते रशिया” हा कार्यक्रम आगामी सहा महिन्यात रशियाच्या विविध भागात पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. संपूर्ण रशियात भारतीय फाईन आर्टमधील रुची लक्षात घेऊन, सांस्कृतिक संबंधासाठीची भारतीय परिषद, रशियाच्या प्रादेशिक केंद्रांमध्ये भारतीय संगीत व नृत्य शिक्षक पाठवणार आहे. “नमस्ते रशिया” या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेले परिचय चिन्ह (लोगो) हे रशियामधील क्रास्नोथ्रास्क या शहरातील एका तरुणाने तयार केले आहे हे समजल्यावर आपल्याला खूप आनंद झाला असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
2.आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये उद्या आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान करण्यात आहेत. परिचारिकांच्या प्रशंसनीय कार्याची दखल घेण्याच्या उद्देशाने आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने 1973 रोजी राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची स्थापना केली. वर्ष 2014 पर्यंत 306 परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. यावर्षी 35 परिचारिका कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
3.शतकानुशतके भारतीय संस्कृती, कला, संगीत आणि चित्रपटांवर रशियातील नागरिकांनी नेहमीच भरभरुन प्रेम केले आहे, तसेच भारतीय नागरिकांचे देखील रशियन साहित्य आणि परंपरेवर अमाप स्नेह आहे असे उद्‌गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. रशियामध्ये मॉस्को येथे रविवारी “नमस्ते रशिया” या भारतीय संस्कृती महोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. रशियाच्या संस्कृती मंत्रालयाच्या पाठिंब्याने “नमस्ते रशिया” हा कार्यक्रम आगामी सहा महिन्यात रशियाच्या विविध भागात पोहोचेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. संपूर्ण रशियात भारतीय फाईन आर्टमधील रुची लक्षात घेऊन, सांस्कृतिक संबंधासाठीची भारतीय परिषद, रशियाच्या प्रादेशिक केंद्रांमध्ये भारतीय संगीत व नृत्य शिक्षक पाठवणार आहे. “नमस्ते रशिया” या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेले परिचय चिन्ह (लोगो) हे रशियामधील क्रास्नोथ्रास्क या शहरातील एका तरुणाने तयार केले आहे हे समजल्यावर आपल्याला खूप आनंद झाला असेही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
11. May
1.ज्येष्ठ अभिनेते निर्माते शशी कपूर यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज प्रदान करण्यांत आला. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित सोहळयात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कपूर यांना सुवर्णकमळ, 10 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या पुरस्काराने गौरविण्यांत आले. चित्रपट क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल केंद्र सरकारच्या वतीने चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत अष्टपैलू व्यक्तीमत्व अशा शब्दात शशी कपूर यांचा गौरव करत अरुण जेटली म्हणाले की कपूर यांनी चित्रपट क्षेत्रातील आपल्या कारकिर्दित मोलाची भूमिका पार पाडली. बॉलिवूड आणि हॉलिवूड एकत्र आणल्याबद्दलही जेटली यांनी शशी कपूर यांची प्रशंसा केली. जेष्ठ दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यानंतर या घराण्यांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे शशी कपूर हे तिसरे व्यक्तिमत्व आहे. शशी कपूर यांना 46 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यांत आले आहे. या पुरस्कार सोहळयाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभबच्चन, जेष्ठ दिग्दर्शक श्याम बॅनेगल, गोविंद निहलानी, आशा पारेख, हेमा मालिनी, रेखा, आशा भोसले, जावेद अख्तर, शबाना आझमी, झीनत अमान, कृष्णा कपूर, सैफ अलि खान, आदि चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. ऋषी कपूर, रणबीर कपूर , कूणाल कपूर आणि संजना कपूर आदि कुटूंबातील सदस्यही या कार्यक्रमाला उपस्थित होते. रणबीर कपूर याने कविता सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली तर ऋषी कपूर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमादरम्यान शशी कपूर यांचे चित्रपट आणि या क्षेत्रातील त्यांचे कार्य यावर आधारीत एक ध्वनीचित्रफित सादर करण्यात आली. शशी कपूर हे एक उदार व्यक्तीमत्व असून त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या पृथ्वी थिएटर मध्ये त्यांचा सन्मान होणे अत्यंत संयुक्तिक असल्याचे अमिताभ बच्चन यांनी आपल्या आभार प्रदर्शनात सांगितले. 1961 मध्ये “धर्मपूत्र” या चित्रपटव्दारे शशीकपूर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दिची सुरुवात करत जवळजवळ 150 हून अधिक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. साठ सत्तर आणि एैशींच्या दशकादरम्यान हिन्दी चित्रपट सृष्टित लोकप्रिय अभिनेता अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आंतरराष्ट्रीय चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या भारतीय कलाकारांपैकी ते एक आहेत. 1978 मध्ये शशीकपूर यांनी आपली निर्मिती संस्था सुरु केली. या संस्थेव्दारे जुनून (1978), कलयुग (1981), 36 चौरंगी लेन (1981), विजेता (1982) आणि उत्सव 1984 आदी चित्रपटांची निर्मिती करण्यांत आली.
2.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी (वय 84) यांचे आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. छातीत जंतुसंसर्ग (न्यूमोनिया) झाल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी जयश्री, मुलगा बिपीन, मुलगी अंजली व नातवंडे असा परिवार आहे. हृदयविकाराच्या त्रासामुळे जोशी यांची प्रकृती वर्षभरापासून अधूनमधून बिघडत होती. आठ दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कसबा पेठेतील “पसायनदान‘ या त्यांच्या बंगल्यात सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोशी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. जोशी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1931 मध्ये झाला. धुळे जिल्ह्यात सहा वर्षे संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिले. दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातही त्यांनी सहभाग घेतला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची त्यांनी 1974 मध्ये स्थापना केली. स्वयंसेवक व कार्यकर्त्यांमध्ये नाना या नावाने जोशी परिचित होते. त्यांनी 1977 मध्ये पुण्यात ग्राहक पेठ सुरू केली. ग्राहक संरक्षण कायदा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्राहक चळवळ रुजविण्याकरिता त्यांनी बारा राज्यांतून “ग्राहक परिक्रमा‘ केली होती. युती सरकारने ग्राहक कल्याण हे स्वतंत्र खाते तयार केले. त्या खात्याचे काम पाहताना जोशी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता
3.वन विभागातर्फे बुद्धपौर्णिमेला झालेल्या मयुरेश्वर अभयारण्यातील प्राणी गणनेमध्ये चिंकारा जातीच्या हरणांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात केलेल्या उपाययोजना आणि लोकसहभागामुळे यंदा २५७ हरणांची नोंद झाली आहे, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली. बारामती तालुक्यातील मयुरेश्वर हे हरणांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. याच भागाला लागून असलेल्या तांदुळवाडी गावात गेल्या वर्षी चिंकारा वनउद्यान व सावळ गावच्या हद्दीत पक्षिनिरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. चिंकारा उद्यानामध्ये हरणांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे बुद्धपौर्णिमेला वन विभागाने मयुरेश्वर अभयारण्यात प्राणी गणना केली. कुतवळवाडी दर्गा, बोअरवेल हातपंप, टॉवर शेजारी, सिमेंट टँक अशा सात ठिकाणच्या पाणवठ्यांवर वनविभागाच्या चौदा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्राणी प्रगणना केली. यामध्ये २५७ चिंकारांची नोंद करण्यात आली आहे. यात १३८ माद्या, ९२ नर तर २७ पाडसांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिंकारांच्या संख्येत ७० टक्क्यांची वाढ झाल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. नागोसे यांनी स्पष्ट केले. चिंकारांबरोबरच १० ससे, ५ खोकड या प्राण्यांसह पक्ष्यांच्याही नोंदी झाल्या आहेत, असे नागोसे म्हणाले. मोर, कावळा, चिमणी, तितर, खाटीक, टिटवी, पाणकोंबडी, केतवाल हे पक्षीही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. दरम्यान अभयराण्यालगतच्या वडाणे, शिर्सुफळ, कानडवाडी या भागात ३० चिंकारांसह इतर प्राण्यांची नोंद झाली आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. राऊत यांनी सांगितले.
9. May
1.महिलांसाठी एक थांबा केंद्र योजनेला 4 मार्च 2015 रोजी मंजुरी देण्यात आली. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 18.58 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेत हिंसाचारग्रस्त महिलांना वैद्यकीय मदत, पोलीस सहकार्य, कायदेशीर सल्ला, न्यायालय व्यवस्थापन, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा पुरवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशात 1 एक थांबा केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी निधी वितरित करण्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत ही केंद्रे महिला हेल्पलाईन क्रमांक (181) आणि अन्य विद्यमान हेल्पलाईनशी जोडण्यात येणार आहेत.
2.केंद्र सरकारने 25 डिसेंबर 2014 रोजी संपूर्ण देशभरात ‘मिशन इंद्रधनुष्य’ हे अभियान सुरू केले. देशातील निवडक 201 जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. मिशन इंद्रधनुष्य अभियानांतर्गत एप्रिलपासून सलग चार महिने आठवडाभर हे अभियान राबवले जाणार आहे. अभियानाच्या आणखी तीन फेऱया 7 ते 13 मे, 7 ते 13 जून आणि 7 ते 13 जुलै या दरम्यान होणार आहे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर व हिपेटायटीस बी अशा सात जीवघेण्या रोगांपासून बालकांना वाचवण्यासाठी मिशन इंद्रधनुष ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
3.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अचल कुमार ज्योती यांची भारत निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
4.स्वामी चिन्मयानंदांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाण्याचे प्रकाशन केले. सामाजिक सुधारणा व शिक्षण क्षेत्रातील अग्रणी स्वामी चिन्मयानंदांच्या कामाचे पंतप्रधानांनी स्मरण केले. आपल्या ऐतिहासिक वारस्यापासून दुरावलेल्या उच्चभ्रू समाजात महान भारतीय संस्कृती मुल्ये व आध्यात्मिक परंपरा रुजवणारे स्वामी चिन्मयानंद अत्यंत द्रष्टे होते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भगवतगीतेविषयी बोलताना ज्ञानमार्गी असणारे स्वामी चिन्मयानंद शाळांमध्ये व रुग्णालयांमध्ये काम करताना कर्ममार्गी होते. त्यांचे जीवन इतरांसाठी आदर्श होते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
5.महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे विधवा तसेच पीडित महिलांसाठी स्वाधार गृह व लघुमुक्काम गृह उभारणीसाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. सध्या वृंदावन येथे ४ स्वाधार आश्रम व एक लघुमुक्काम केंद्रे कार्यरत आहेत. या आश्रमांमध्ये लाभार्थ्यांना मोफत निवारा, अन्न, आरोग्यसेवा, कपडे व समुपदेशन दिले जात असल्याची माहिती केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत दिली.
8. May
1.भारताची चांद्रयान-2 ही मोहिम 2017-18 दरम्यान सुरू होईल. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्हीद्वारे चांद्रयान-2 प्रक्षेपित केला जाणार आहे.
2.माहिती प्रसाराच्या बहुविध वाहिन्यांच्या पार्श्वभूमीवर बातम्यांचे उद्देश्यपूर्ण सादरीकरण अपवादात्मक ठरू नये असं केंद्रीय अर्थमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. सध्याच्या बातम्या प्रासंगिक, स्पर्धात्मक आणि निवेदक प्रेरित असल्या तरी सद्यस्थिती आणि अचूक माहितीवर आधारित बातम्यांसाठी अजूनही वेगळे स्थान आहे. समस्या आणि घटनांबाबत सर्वसमावेशक मत जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा असते. त्याचवेळी उद्देश्यपूर्ण बातम्या सादर करण्याची विश्वासार्हता सातत्याने माहिती अद्ययावत करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. डीडी न्यूजच्या मोबाईल ॲपचे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचया अन्य ई-उपक्रमांचे उद्‌घाटन केल्यावर जेटली बोलत होते. डीडी न्यूजचया ॲपचे उद्‌घाटन हे प्रसारभारतीसाठी महत्वपूर्ण आहे कारण यामुळे भारतीय प्रेक्षकांची माहितीची गरज पूर्ण होणार आहे असे ते म्हणाले. यामुळे बारा महिने चोवीस तास उद्देश्यपूर्ण बातम्या पुरवण्यासाठी डीडी न्यूजला एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. ॲपच्या माध्यमातून माहिती मिळवण्याची प्रेक्षकांची गरज पूर्ण होईल. इंडिया-2015 आणि भारत-2015 चे ई-रुपांतर करण्यात आल्यामुळे डिजिटल माध्यमातील प्रेक्षकांना भारतासंबंधी माहितीचा खजिना व्यापक प्रमाणावर खुला होईल असं ते म्हणाले. डिजिटायझेशनद्वारे प्रकाशन विभागाने या उद्योगातील समकालीन बदलांशी जुळवून घेतले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ई-बुकबाबत जेटली म्हणाले की, यात गेल्या वर्षभरातल्या उपक्रम आणि कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. चित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून वाचक-स्नेही स्वरुपात माहिती सादर करणे हा यामागचा उद्देश आहे. स्मार्ट फोन्सवर थेट बातम्या आणि व्हिडियो उपलब्ध करून देण्यासाठी डीडी न्यूजचे मोबाईल ॲप सुरू केले आहे. हे वापरण्यास सोपे असून नेटवर्क खराब असले तरी ते उपलब्ध होते. ॲपची ॲन्ड्राईड आणि आय-फोन रुपांतरे उपलब्ध आहेत. इंडिया/भारत 2015 च्या ई-रुपांतराचा उद्देश जनतेला वाचनाचा उत्तम अनुभव देणं हा आहे. ही ई-बुक्स सहज डाऊनलोड करता येतील.
3.एप्रिल 2015 दरम्यान रेल्वेच्या एकूण महसूलात 17.63 टक्के वाढ होऊन तो 14125.15 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात हा आकडा 12008.56 कोटी रुपये इतका होता. एप्रिलमध्ये रेल्वेला मालवाहतूकद्वारे 9552.51 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात 16.85 टक्के वाढ झाली आहे. याच दरम्यान प्रवासी वाहतुकीद्वारे रेल्वेला 4013.66 कोटी रुपये उत्पन्न मिळाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 19.70 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2015 मध्ये 658.29 दशलक्ष प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली. गेल्या वर्षी ही संख्या 684.32 दशलक्ष इतकी होती.
4.कोळसा खाणी स्पर्धात्मक बोली नियम 2012 च्या लिलावातील तरतूदींअंतर्गत 6 कोळसा खाणींचे वाटप सरकारी कंपन्या/महामंडळांना करण्यात आले आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. याशिवाय कोळसा खाणी (विशेष तरतूद) कायदा 2015 च्या तरतूदी आणि नियमांअंतर्गत 38 कोळसा खाणींचे सरकारी कंपन्या/महामंडळांना वाटप करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गेअर पाल्मा सेक्टर 2 या कोळसा खाणीचा समावेश असून ती महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी लिमिटेडला देण्यात आली आहे.
7. May
1.कापसाच्या निर्यातीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसून 8 डिसेंबर 2014 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कंत्राट नोंदणीची अटही काढून टाकण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत दिली. परकीय देशांना जेवढी गरज असेल तेवढा कापूस भारताकडून खरेदी करण्याची मुभा आहे. सीमेलगत असणाऱ्या देशांचा विचार करता चीन, बांगलादेश व पाकिस्तान हे भारताकडून सर्वाधिक कापूस आयात करणाऱ्या पाच प्रमुख आयातदारांपैकी तीन देश आहेत. सीमेलगत असलेल्या इतर देशांकडून भारतीय कापसाची किरकोळ आयात होते. गेल्या तीन वर्षात पाच प्रमुख आयातदारांकडून केलेल्या आयातीमध्ये सर्वाधिक आयात चीनने केली होती तर बांगलादेश कापसाच्या आयातीमध्ये दुसऱ्या आणि व्हिएतनाम तिसऱ्या क्रमांकावर होता.
2.रेल्वे प्रवासी सुविधा व्यवस्थेतील सुधारणेपासून रेल्वेतील पायाभूत विकासासंदर्भात अर्थसंकल्पात केल्या गेलेल्या ३९ विविध घोषणांची अंमलबजावणी अवघ्या ३६ दिवसांत करून रेल्वे मंत्रालयाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे बोर्डाला सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. रेल्वे अर्थसंकल्पातील तरतुदींच्या अंमलबजावणी कामावर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाकडून ई-समीक्षा ही ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली होती त्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्याकडून वेळोवेळी आढावा बैठका घेण्यात आल्या होत्या. अंमलबजावणी झालेल्या घोषणांमध्ये स्वछ्ताकामासाठी स्वतंत्र विभाग, १ मे नंतर तयार होणाऱ्या नवीन नॉनएसी रेल्वे डब्यांसाठी कचरापेट्या, निकडीच्या प्रसंगांसाठी १८२ ही हेल्पलाईन​​ ​सेवा, रेल्वेसंबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी ऑनलाईन पोर्टल, पाच मिनटात विना आरक्षित तिकीट काढण्यासाठी ऑपरेशन ५ मिनिट, शारीरिक विकलांग व्यक्तींसाठी सवलतीच्या दारात तिकीट, हिंदी ई-तिकीट पोर्टल आदी विविध सुविधांचा समावेश आहे.
3.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्‍स दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये 36 राफेल विमाने फ्रान्सकडून पूर्णपणे उडण्यासाठी सज्ज स्थितीमध्ये भारताच्या ताब्यात घेण्याचा समावेश होता. या प्रक्रियेचा पाठपुरावा करण्यासाठी आज संरक्षणमंत्राी मनोहर पर्रिकर व फ्रान्सचे संरक्षणमंत्री ला ड्रिॲन यांच्यात नवी दिल्ली येथे चर्चा झाली. हा करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी अभय देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी सहमती दर्शवली. यासंदर्भात तपशिलवार कालबध्द प्रक्रिया राबवण्यासाठी पथके स्थापन करण्याचा दोन्‍ही देशांनी निर्णय घेतला.
4.२०१५ मधील हॅनॉव्हर येथील औद्योगिक प्रदर्शनादरम्यान भारतीय उद्योगांनी जर्मनीशी अनेक सामंजस्य करार केले आहेत. या करारांतून भारतात मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक तसेच नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणार असून त्यामुळे उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत तसेच भारतीय अर्थव्यवस्थेलाही यामुळे चालना मिळणार आहे. सौर व पावन उर्जानिर्मिती, सांडपाणी प्रक्रिया, अभियांत्रिकी तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा विकास, रेल्वे अशा विविध क्षेत्रात भारतीय कंपन्यांनी जर्मनीशी ११ सामंजस्य करार केले आहेत, अशी माहिती वाणिज्य व उद्योग राज्य मंत्री(स्वतंत्र पदभार) निर्मला सितारामण यांनी राज्यसभेत दिली.
Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment

Facebook


MPSCinfoPORTAL. Powered by Blogger.