धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळी
ब्रिटिशांकडून झालेल्या पराभवाचे कारण भारतीय समाज्याच्या अवनतित आहे, असे अनेक भारतीय
बुधीवन्ताचे मत बनले. त्यांना भारतीय समाजात व धर्मामध्ये अनेक दोष आढळे . ब्रिटीश प्रशासन ,
ब्रिटीश अधिकारी ,ख्रिस्ती धर्मोपदेशक व पाच्यात्य शिक्षण याद्वारे पाश्च्यात्य जगतातील आधुनिक मुल्ये व विचार यांचा प्रसार या विचारवन्तामध्ये झाला होता . यातून धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा यांची मुहूर्तमेढ रोवली गेली .

धर्मसुधारणा
"जी गोष्ट व्यक्तीची तीच देशाची . खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार राजकीय हक्क प्राप्त करून घेण्यास राष्ट्रीय सभा भरवा किवा सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास सामाजिक परिषद भरवा ; परंतु जोपर्यंत धर्मजागृती झाली नाही , तोपर्यंत देशास या खटपटीत यश यावयाचे नाही. प्रथम आत्म्याचीच उन्नती झाली पाहिजे ". रा . गो भांडारकर यांचे वरील मत पाहता तत्कालीन राष्ट्रीय जीवनातील धर्माचे व धर्मसुधारणांचे महत्त्व स्पष्ट होते.
धर्ममध्ये सुधारणा का ?
सुधारकांना प्रस्थापित धर्म हा प्रगतीतील अडथ ळा वाटला. अनेकेश्वरवाद,मूर्तीपूजा,आचारधर्माचा प्रभाव,
पुनरजन्मावर विश्वास ,दैववाद ,परमपरांचा प्रभाव व समाजजीवनावर धर्माचा अतिरिक्त पगडा हि मध्ययुगीन हिंदी समाजाची वैशीषःटे होती . मध्ययुगामध्ये हा धर्म लोकांना खटकला नाही . पण बुद्धिवाद ,विवेकनिष्ठा ,ऐहिकता यावर आधारित ,विज्ञाननिष्ठा,मानवतावाद ,व्यक्तीस्वातंत्र्य व समता या नवीन प्रेरणा घेऊन आलेल्या आधुनिक युगात नवशिक्षीताना या धर्मामध्ये अनेक दोष दिसू लागले. आता एकेश्वरवाद,विश्वधर्म,विवेकनिष्ठा ,मानवतावाद ,व ऐहिकता यावर आधारित धर्मविचार पुढे आले . या सुधारकांनी भौतिक प्रगतीला महत्व दिले धर्म व व्यवहार यांची फारकत केली . मूर्तीपूजा,रूढीपरंपरा व पोथिनिष्ठा यांना विरोध केला. या सर्व सुधारणांनी धर्माच्या अवडंब राचा निषेध केला . कर्मकांडामध्ये व स्वर्ग -नरक यांच्यात अडकलेल्या धर्माला आपल्या परीने शुद्ध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला . अनेकांना वेद वा उपनीषीदानमध्ये धर्माचे शुद्ध स्वरूप सापडले.
राजा राम मोहन रॉय यांचा 'ब्राम्हो समाज '(१८२८),स्वामी विवेकानंद यांचा 'रामकृष्ण मिशन'(१८२७),
दयानंद सरस्वतींचा 'आर्य समाज ',आत्माराम पांडुरंग यांचा 'प्रार्थना समाज '(१८६७) या व इतर अनेक संस्था
व व्यक्तींनी धर्मसुधारनेला प्रथम पसंती दिली
सर्व धर्मसुधारकाणी नीतीवर चांगल्या वागणुकीवर फार मोठा भर दिला. या सुधारकांनी नीतीची संकल्पना पारंपारिक नीती कल्पनेपेक्षा वेगळी होती. धर्म व आज्ञापालन याऐवजी विवेकबुद्धी हा सुधारकप्रणीत नीतीचा आधार होता. प्रत्येकामध्ये असणारी विवेकबुद्धी शिक्षणाच्या सहायाने विकसित करता येते . या भूमिकेतून शिक्षकांनी पाश्चात्य शिक्षणावर भर दिला. मानवतावाद ,व्यक्तीस्वातंत्र्,समता,बंधुता,प्रेम,सत्य,इत्यादी,नीती मुल्ये सुधारकांनी आदर्श मानली. याच नीतीकल्पनेवर सुधारकांच्या सामाजिक सुधारणा आधारित होत्या.
एवढेच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील सुधारणा या नीतीवर म्हणजेच आत्म्याच्या उन्नतीवरअवलंबूनआहेत,असे
सर्व सुधारकांना वाटत होते .
अशाप्रकारे धर्म हा समाजाचा एक अभिन्न अंग असल्यामुळे त्यामधील सुधारणा समाजसुधारणाच ठरल्या . अनेक सुधारकांनी धर्माला प्राधान्य दिले ते यामुळेच. या सुधारकांनीच आपल्या कृतीने धर्मामध्ये
सुधारणा घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, आणि साऱ्या समाजाचेच चित्र हळू -हळू बदलू लागले .

सामाजिक सुधारणा
भारतात १९व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरु झालेल्या वैचारिक क्रांतीमुळे मानवी जीवनाकडे पाहण्याचा नवा
आधुनिक दृष्टीकोन विकसित झाला. बुधीवाद तर्कनिष्ठा ,मानवतावाद या तत्वांनी आधुनिक द्रुष्टीकोणाला
आकार दिला. या आधुनिक द्रुष्टीकोनातुन काही सुबुद्ध भारतीय प्रचलित समाजव्यवस्थेचे,अन्गोपागाचे
जीवनपद्धतीचे तौलानिक दृष्ट्या परीक्षण करू लागले. असे करताना समाजातील काही घटकांवर होणारा
अन्याय,जुलूम ,विषमता यांच्या दृष्टीस पडली. या अनिष्ट प्रवृत्ती व पद्धती नष्ट करण्याचा व समाज निरोगी बनवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. या त्यांच्या प्रयत्नातून भारतामध्ये सामाजिक सुधारणेच्या युगाचा प्रारंभ झाला .
१९ व्या शतकातील सुधारणा कार्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रवाह आढळून येतात. हे तीनही प्रवाह जरी भिन्न असले तरी त्यांचे अंतिम ध्येय मात्र भारतामध्ये समाजसुधारणा घडवून आणणे हेच होते.
समाजसुधारणेचा पहिला प्रवाह
सुधारणा वाद्यांच्या या मावळ गटाचे प्रणेते होते राजा राममोहन रॉय . समाजसुधारणेचा विचार समाजावर सोपवून भागणार नाही,तो विचार समाजातूनच उदयाला यायला पाहिजे व त्यासाठी लोकजागृतीची निकड
आहे,असे या सुधारणावाद्यांचे मत होते. सुधारणेची गरज समाजाला जाणवून देण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय लिखाण केले . ईश्वरचंद्र विद्यासागर ,पिअरीचंद्र व किशोरीचंद्र मित्रा ,गिरीशचंद्र घोष,केशवचंद्रसेन,न्यायमूर्ती रानडे इत्यादी मंडळी या गटामध्ये राजा राममोहन रॉय यांच्या बरोबर आघाडीवर होती.
या गटाला लोकजागृती बरोबरच कायद्याचे सहाय्य घेणे हितकारक व आवश्यक वाटत होते. सतिप्रथे विरुद्ध राममोहन यांनी सातत्याने केलेला प्रसार आणि सातीबंदी ला दिलेला पाठींबा किवा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाच्या समर्थनार्थ केलेले लिखाण व त्या कायद्याचा केलेला पाठपुरावा हि उदाहरण बोलकी आहेत. लोकजागृतीसाठी सामुहिक संघटीत कार्याची गरज त्यांना जाणवल्यामुळे ब्राम्हो समाज सारख्या संस्थाही त्यांनी स्थापन केल्या. अशा रीतीने समाजसुधारणेच्या हेतूने संस्थात्मक कार्याचा प्रारंभ या पहिल्या प्रवाहाने केला .

दुसरा प्रवाह
समाजसुधारणा चळवळीतील दुसरा प्रवाह याहून काही अशी भिन्न विचारसरणीचा होता. या गटाला भारतीय
समाज्याच्या सुधारणेची ,त्यात अंगभूत असलेल्या उणीवा व दोष नष्ट करण्याची निकड जाणवली होती.
त्यासाठी पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होणे आवश्यकही वाटत होते. या उदिष्टपूर्तीसाठी इंग्रजी भाषेतून पाश्चात्य विद्येचा अभ्यासही त्यांना आवश्यक वाटत होता. परंतु भारतीय समाजव्यवस्थेत व धर्मव्यवस्थेत परकीय
शासकांच्या हस्तक्षेपाला त्यांचा कसून विरोध होता. समाज्याच्या हिताच्या द्रुष्टीने बदल घडवून आणायचे
ते भारतीयांच्याच प्रयत्नाने झाले पाहिजे असे त्यांचे प्रामाणिक मत होते. या गटाचे अद्व्हर्यू बंगाल मध्ये राधाकांत रेब होते. ते एक व्यासंगी विद्वान होते . आपल्या विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी १८३० साली 'धर्मसभा ' स्थापन केली , व 'समाचार चंद्रिका सारख्या पत्रीकांतून सामाजिक व धार्मिक बाबतीत शासकीय हस्तक्षेपाला विरोध केला . पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटाने दिपून गेलेल्या व त्या प्रभावामुळे भारतीय संस्कृती त्याज्य मानणाऱ्या तरुण वर्गाला आवर घालण्याचे काम त्यांनी केले. या गटामध्ये राधा माधव मुखर्जी,काशिनाथ ब्यानर्जी हि मंडळी मोडतात .
तिसरा प्रवाह
समाजसुधारणा चळवळीच्या क्षेत्रातील हा तिसरा प्रवाह होता तो कट्टर बुद्धिवादी झहाल सुधारकांचा , बंगाल मधील या गटाचे नेतृत्व हेन्री डेरोझीओ या अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या व स्वतंत्र वृत्तीच्या प्रतिभावंत तरुणाने केले. यांच्यावर लॉक ,ह्यूम ,बेंथम ,या इंग्रज बुद्धिवादी विचारवंतांचा खोलवर प्रभाव होता.
No comments:
Post a Comment